अर्जुनी मोर.-क्रांताज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्रियांना शिक्षणाचे बाळकडु पाजले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे माध्यमातुन स्रियांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवुन दिले.त्यामुळेच आज महिला अबला नसुन सबला झालेल्या आहेत.स्रियांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी उमेद व महिला बचत गटाच्या माध्यमातून शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.आज महिला शिक्षित झाल्यानेच परिवार, नोकरी, उद्योग व्यवसायासोबतच समाजकारण व राजकारणात मोठमोठी पद सांभाळून प्रगतीपथावर आहेत. आज महिला भगिनींचे अनेक कार्यक्रम स्वत: महिला राबवीत आहेत. त्यातच हळदीकुंकु कार्यक्रम महिलांना संघटीत व जागृती निर्माण करण्याचे माध्यम ठरत आहे.असे प्रतिपादन जि.प.सदस्य रचनाताई गहाणे यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोर. तालुक्यातील तावसी / खुर्द येथे गोवारी समाज महिला मंडळाचे वतीने ता.28 आयोजित हळदीकुंकु कार्यक्रमात रचनाताई गहाणे बोलत होत्या.सदर कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच मिनाबाई शहारे यांचे हस्ते ,जि.प.सदस्या रचनाताई गहाणे यांचे अध्यक्षतेखाली नितु ब्राम्हणकर,विमल सोनवाने,शेंडे ताई,उर्मिला जांभुळकर, राजश्री लांजेवार,उज्वला परसमोळे, तेरस बगधा,यशोधरा शहारे,कुंभरे ताई,देविका शहारे,भुमीता सोनटक्के,प्रामुख्याने उपस्थीत होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यानंतर महिला संवाद भेटीगाठी,विचाराची आदानप्रदान करुन एकमेकींना वान म्हणुन भेटवस्तू देण्यात आल्या,यावेळी सरपंच मिनाबाई शहारे यांनी हे कार्यक्रम आयोजीत करण्यामागची भुमिका विशद केली.कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी महिला उपस्थीत होत्या.