गोंंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व खोडशिवनी ग्रामपंचायतचे सरपंच गंंगाधर परशुरामकर यांनी आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा शेतकरी वर्गाच्या तोंंडाला पाने पुसणारा असल्याचे म्हटले आहे.देशाच्या अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी आज संसदेत अर्थ संकल्प सादर केला.त्यात कृषी क्षेत्राविषयी खूपच चर्चा झाली कृषी उत्पादन वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. शेतकरी कृषी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतातच पन खर्चावर आधारित भाव जो पर्यन्त मिळत नाही, तो पर्यन्त फायदा काय. दररोज डिझेलचे दर, खताचे दर, कीटकनाशकांचे भाव वाढत चालले आहेत.परंतु कृषी उत्पादनाचे भाव वाढत नाही म्हणून हे बजेट शेतकरी वर्गाचे तोंडाला पाने पुसणारे असल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे.