बिहार निवडणूकीकरीता सादर झालेला अर्थसंकल्प-अमर वराडे

0
53

गोंदिया- भारताच्या इतिहासात नोंद होईल असा केंद्र सरकारने फक्त बिहार राज्याकरिता मांडलेला हा अर्थसंकल्प आहे. बिहार राज्यातील होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीत स्वबळावर भाजपाला जिंकायची असल्यामुळे फक्त एक बिहार राज्याकरिता मांडलेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांचे जीवन स्तर उंचावेल अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही. महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्यामुळे आता केंद्र सरकारला महाराष्ट्राची गरज राहिलेली नाही. अर्थसंकल्पाच्या टोपलीत सगळ्यात जास्त महसुली उत्पन्न देणाऱ्या राज्य महाराष्ट्र असल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याकरिता कुठलीच भरीव तरतूद करू शकले नाही. गोरगरीब जनतेकरिता अतिशय निराशाचा जनक असा अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडलेला आहे. केंद्र सरकारने देशातील निवडक कंत्राटदारांना फायदा पोहोचविणारा हा अर्थसंकल्प आहे…… अमर वराडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी