* संमेलनाध्यक्ष : प्रा. गंगाधर अहिरे
* उद्घाटक : प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर
वर्धा, दि. २ : समता साहित्य मंच, आर्वी-आष्टी व कारंजाद्वारा ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी कारंजा (घाडगे) येथे एक दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात संपन्न होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. गंगाधर अहिरे आणि अमरावतीचे सुप्रसिद्ध कवी व समीक्षक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर बाबाराव सोमकुंवर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
या एक दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनात उद्घाटन सत्र, गौरव, एक परिसंवाद, एक नाट्यप्रयोग, एक कविसंमेलन आणि समारोप सत्र अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या सोहळ्याला डॉ. अनिल भगत, स्वाती भिलकर व प्रशांत वंजारे हे प्रमुख अतिथी म्हणून राहतील. यावेळी ‘एक क्षण गौरवाचा’ या कार्यक्रमा अंतर्गत मधुकर गडलिंग, पी. पी. मोहोड, विठ्ठलराव झाटे, प्रकाश कांबळे, दादाराव रामटेके, कैलास गौरखेडे, शंकर गाडगे यांचा गौरव करण्यात येईल.
उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात दुपारी २ वाजता ‘आंबेडकरी चळवळ : वाटचाल आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. अशोक इंगळे (अकोला) हे राहणार असून डॉ. गजानन लोहवे, डॉ. चंद्रकांत सरदार, प्रा. अरविंद सुरोसे, दिगंबर झाडे व डॉ. विजया मुळे हे या परिसंवादात भाग घेतील. त्यानंतर नागपूरच्या पल्लवी जीवनतारे ‘बाबा तुमचा समाज मेला !’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतील.
या नाट्यप्रयोगानंतर कवी पुरुषोत्तम डोंगरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून या कविसंमेलनात विलास थोरात, अमृता मनोहर, मायाताई वासनिक, भूषण रामटेके, प्रशांत वंजारे, गणेश थोरात, दिगंबर झाडे, संजय डोंगरे, सोपान दातार, संजय घरडे, सचिन तायडे, राजकुमार सोनटक्के, पुष्पाताई बोरकर, काशिनाथ वेलदोडे, आर.एस. तायडे, संजय ओरके, संजय मोखडे, गणेश लांडगे, निर्मल काळबांडे, प्रकाश बनसोड, देविलाल रौराळे, प्रकाश कांबळे, नंदकिशोर दामोधरे, एम. डी. बागडे, कृष्णा हरले, सुरेश भिवगडे, अरुण मानकर, प्रशांत ढोले, रवि दलाल, दिलीप शापामोहन, पदमाकर मांडवधरे, रोशन गजभिये, प्रकाश जिंदे, अभिजीत राऊत, प्रांजली आत्राम, नंदा पांडे, भाष्कर काळे, सचिन सूर्यवंशी, विजया मुळे, देविदास निकाळजे, राजेश दहिवडे, यशवंतराव सहारे, किशोर डाले, सागर भोवते, संदीप हगवणे, दिलीप थूल हे निमंत्रित कवी भाग घेणार आहेत.
दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांनंतर सायंकाळी ६ वाजता प्रा. गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे समारोप सत्र पार पडेल. यात प्रल्हाद देशभ्रतार, अरुण भोगे व डी. सी. खंडेराव (उपविभागीय पोलिस अधिकारी, आर्वी) हे प्रमुख अतिथी असतील.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी आयोजन समिती, स्वागत समिती, संयोजन समिती व प्रसिद्धी समितीचे सर्व पदाधिकारी तसेच सभासद कार्यरत असून साहित्य रसिकांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या संमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहन समता साहित्य मंचच्या वतीने हेमराज खोब्रागडे, दिगंबर झाडे, अशोक नागले, सुरेश भिवगडे, बुद्धदास मिरगे, धर्मशील गेडाम, राजकुमार सोनटक्के आणि आर. एस. तायडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.