गोंदिया : क्षत्रिय पोवार राजाभोज महारॅली उत्सव समिती गोंदियाच्या वतीने राजाभोज जयंती महोत्सवानिमित्त महारॅलीचे आयोजन दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते बालाघाट-शिवनीचे खासदार सौ.भारती पारधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी सहउद्घाटक म्हणून परसवाडाचे आमदार मधु भगत, दिप प्रज्वलक वाराशिवनीचे आमदार विवेक पटेल, कटंगीचे आमदार गौरव पारधी, माजी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, पोवार महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे, पोवार महासंघाचे अध्यक्ष विशाल बिसेन, राजेंद्र बिसेन, भालचंद्र ठाकूर, मोतीलाल चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार खुशाल बोपचे, वैâलाश हरीणखेडे, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, हेमंत पटले, खोमेश्वर रहांगडाले, जि.प.सभापती संजय टेंभरे, नेतराम कटरे, झामसिंग बघेले, पंवाऱ महासभेचे संघटन सचिव व संपादक खेमेंद्र कटरे, अॅड.पृथ्वीराज चव्हाण, सुरेश भक्तवर्ती, राजेश चौहान, किशोर भगत, धनंजय तुरकर, गोंविद तुरकर, एच.एच.पारधी, टी.बी.कटरे, देवरी पं.स.सभापती अनिल बिसेन, तिरोडाचे पं.स.सभापती तेजराम चव्हाण, सालेकसा पं.स.सभापती विणा कटरे, गोरेगाव पं.स.सभापती चित्रलेखा चौधरी, उपसभापती सुनंदा पटले, कौशल तुरकर, प्रविण पटले, डॉ.प्रशांत कटरे, केतन तुरकर, अशोक हरीणखेडे, बबलु कटरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महारॅलीला दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौकातून सुरूवात होणार आहे. यानंतर रॅली गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक होत शहर भ्रमण करणार आहे. या रॅलीत जास्तीत जास्त संख्येत उपस्थित व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार (पप्पु) पटले, दुर्गाप्रसाद ठाकरे, प्रविण बिसेन, उमेश पारधी, शामबाबा पटले, संजय ठाकरे, सुरेश रहांगडाले, प्रकाश टेंभरे, प्रवेश बिसेन, पिंटू ठाकूर, सचिन रहांगडाले, भुमेश्वर पारधी आदिंसह पोवार समाज गोंदियाच्या समस्त कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००