संविधान सन्मान संविधान जागर यात्रेचा होणार समापन
गोंदिया : आदिवासी गोवारी शहिद स्मारक समिती झिरो माईल नागपूर आणि आदिवासी गोवारी जमात संघटन समिती महाराष्ट्राच्या वतीने आदिवासी सेवा पुरस्कार वितरण सोहळा व संविधान सन्मान संविधान जागर यात्रेचा समापन कार्यक्रम ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आदिवासी समाजात सेवाभावी कार्य करणार्यांना राज्यस्तरीय संत भाकरे महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके, ना.आशिष जायस्वाल, ना. पंकज भोयर, हंसराज अहिर, खासदार प्रफुल पटेल, खा.श्यामकुमार बर्वे, खा. प्रशांत पडोळे, आ.राजकुमार बडोले, माजी मंत्री परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, आ.विनोद अग्रवाल, आ.सुमित वानखेडे, आ.नाना पटोले, आ.संजय पुराम, आ.राजु कारेमोरे, आ.नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार सुनिल मेंढे, अशोक नेते, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, राजेंद्र जैन आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त ११४ शहिद स्मृतिप्रित्यर्थ ११४ गावात संविधान सन्मान संविधान जागर यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेचा समापन ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजात सेवाभावी कार्य करणार्यांचा राज्यस्तरीय संत भाकरे महाराज आदिवासी सेवा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी गोवारी शहिद स्मारक समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे, सचिव शेखर लसुंते, कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर राऊत, अनिल सहारे, राजाराम नेवारे, चिंतामन वाघाडे, रविकुमार दुधकोर, डेडूजी राऊत, राधेश्याम कोहळे, शहर अध्यक्ष डी.टी.चौधरी, कार्याध्यक्ष मोहन शहारे, रतिराम राऊत, मुकेश कोहळे, चंद्रशेखर (चंदू) नेवारे, प्रेमलाल शहारे यांच्यासह स्मारक समिती व आयोजन समितीचे समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.