देवरी तालुक्यातील गावामध्ये मेगा वॉटरशेड प्रकल्पाच्या अहवालाचे ग्रामसभांमध्ये सादरीकरण

0
32

देवरी,दि.०९ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालांचे तालुक्यातील पिपळखारी,पिंडकेपार व पससोडी गावांमध्ये आयोजित ग्रामसभांमध्ये सादरीकरण करण्यात आले.ही योजना ऍक्सिस बँक फाउंडेशन, भारत रुरल लाइवलीहूड्स फाउंडेशन (BRLF) आणि इंडियन ग्रामीन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच संस्थेचे कर्मचारी काम करीत आहेत.