खासदार पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

0
29

अर्जुनी-मोर.-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, खासदार (राज्यसभा) प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला यशवंत गणवीर (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, तसेच पक्षाचे सदस्य श्रावण मेंढे, नीलकंठ कुंभरे, सुनिता जायस्वाल, अनिषा पठाण, जागेश्र्वर कोरे, नाकाडे, गजानन कोवे, सौरभ पशीने, पुरुषोत्तम बावनकर आदी मान्यवर उपस्थित होते.फळ वाटपाच्या वेळी ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथील वैद्यकीय अधिकारी प्रदीप आनंद व इतर वैद्यकीय कर्मचारी देखील उपस्थित होते.