‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रे’त मल्लखांब, दांडपट्टा ठरले आकर्षण

0
17
*शिवटेकडी येथे शिवाजी महाराजांना अभिवादन
अमरावती, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी – जय भारत पदयात्रा’ काढण्यात आली. सायन्सकोर मैदान येथून निघालेल्या पदयात्रेत मल्लखांब, लेझीम, दांडपट्टा, योगा, शस्त्रकला आदींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पदयात्रेतील ही प्रात्यक्षिक आणि देखावा नागरिकांचे आकर्षण ठरली.
सायन्सस्कोर मैदान येथे झालेल्या कार्यक्रमाला पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
श्री. पापळकर यांनी संपूर्ण देशभरासह 260 देशात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यातून देशाला सन्मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. खासदार डॉ. बोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची देशपातळीवर प्रेरणा घेण्यात आली आहे. संपूर्ण देशातील जनतेच्या स्वाभीमानाचे रक्षण करणारा राजा आहे. गुलामगिरीतून मुक्तता आणि महिलांचा सन्मान करणारा राजा म्हणून छत्रपतींचा आदर्श ठेवला जात आहे. देशभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीतून प्रेरणा प्राप्त होईल. या प्रेरणेतून विकसीत भारत घडविण्यास मदत होणार आहे.
पदयात्रा सायन्सस्कोर मैदान, शिवटेकडी, पोलिस आयुक्त कार्यालय, एनसीसी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौकमार्गे निघाली. पदयात्रेदरम्यान शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालये, शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापिठ एनएसएस विभाग, एनसीसी, स्काऊट गाईड, उच्च शिक्षण संचालनालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, क्रीडा संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्याभारती महाविद्यालय, महापालिकेच्या सर्व शाळा, मनीबाई गुजराती हायस्कूल, गोल्डन किड्स स्कूल, श्री गणेशदास राठी विद्यालय, प्रेमकिशोर सिकजी विद्यालय, संत गाडगेबाबा विद्यालय, शारदा कन्या, कस्तुरबा, होलीक्रॉस इंग्रजी व मराठी, ज्ञानमाता, सेंट झेविअर्स, न्यू हायस्कूल मेन, रामकृष्ण क्रीडा विद्यालय, समर्थ हायस्कूल, वनिता समाज, सेंट पिटरबर्क, साईबाबा विद्यालय, श्रद्धानंद इंग्लीश स्कूल, जॅक अँड जिल प्रायमरी स्कुल, जिल्हा परिषद शाळा, सिंदी हिंदी हायस्कूल, प्रशांत विद्यालय आदी शाळांनी पदयात्रे सहभाग नोंदविला. जेवड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेने शिवजन्माची नाटीका सादर केली.
पदयात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले. यात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत धीरजकुमार आणि मावळ्यांच्या भूमिकेत विनर अॅकॅडमीचे विद्यार्थी, वनिता समाजाचे लेझीम प्रात्याक्षिक, मनपा अधिकारी कर्मचारी यांचा शिवजन्मोत्सव सोहळा, आयडीयल स्कूलचा शिवराज्याभिषेक, कस्तुरबा विद्यालयाचा शिवराज्याभिषेक, मनीबाई गुजराती हायस्कूलचा पोवाडा, जेडीपी मल्लखांब प्रशिक्षण केंद्राची प्रात्याक्षिके, हनुमान प्रसारक मंडळाचा योगा, सोनल रंगारी व त्यांचा संच यांचा शस्त्रकला, लाठीकाठी बंजटी आदी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. सदर पदयात्रे सुमारे 10 हजाराहून अधिक विद्यार्थी, युवक, युवती, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला.