देवरी,दि.२०-देवरी येथील मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी.एम.मेश्राम हे होेते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, पर्यवेक्षक डी.एच.ढवळे, शाळा उपप्रमुख राजू कारेमोरे, एस.पी.देशमुख,एस.डी.गजभिये,वाय.डब्लू.फेंडर,दगडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.माननीय अध्यक्ष प्राचार्य जी.एम.मेश्राम सरांनी विद्यार्थ्यांना सुसंस्काराची गरज आहे.कोणतेही कार्य प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे, अशा आशयाचे भाषण केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो प्रमुख जगदीश खेडकर यांनी केले तर आभार संजय निखारे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी रासेयो स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.