सडक अर्जुनी,दि.२७ – राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा द्वारा संचालित क्षत्रीय राजाभोज पोवार सांस्कृतिक पर्यटन केंद्र
डव्वा, तालुका सडक/अर्जुनीच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी चक्रवर्ती राजाभोज जयंती समारोह क्षत्रिय राजाभोज नगरी, चिरचाडी रोड, डव्वा येथे आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी ०९.०० वाजता राजाभोज दिंडी (मातामाय देवस्थान पासून),दंडार रैली, क्षत्रीय राजाभोज मुर्ती पूजन व त्यानंतर दुपारी १२.०० वाजता पोवार समाज समारोह उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रम तसेच १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राजाभोज दिंडीचे उद्घाटन वरिष्ठ समाजसेवक राजुभाऊ पटले यांच्या हस्ते माजी सरपंच इंजि. डी.यु. राहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. राजाभोज दिंडीचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष छायाताई भुमेश्वर चौव्हान उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून के.बी.चौधरी,बेरार टाईम्सचे संपादक खेमेन्द्र कटरे, महेन्द्र बिसेन, भागचंद रहांगडाले,खुशाल कटरे, आय.डी कटरे,नोकराम येळे, दिलीप राहांगडाले, संपत कटरे,डेकनलाल राहांगडाले आदी उपस्थित राहणार आहेत.
पोवार समाज सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धाटन देवरीचे पंचायत समिती सभापती अनिल बिसेन यांच्या हस्ते राजाभोज महारॅली उत्सव समिती गोंदिया चे अध्यक्ष पप्पू पटले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी दिपप्रज्वलक
म्हणून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती डॉ लक्ष्मण भगत,जिल्हा परिषद सदस्य डॉ भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्य शशिभाऊ भगत, डव्वा सरपंच श्रीमती योगेश्वरीबाई चौधरी, डॉ जितेन्द्र रहांगडाले, (अध्यक्ष, क्षत्रिय राजाभोज संघटना देवरी), डॉ. भुमेश्वर कवडु पटले तर विशेष अतिथी म्हणून प्रा.किशोर पटले, विश्वनाथजी राहांगडाले, सुरेन्द्र (बब्लु) पटले,विजय बिसेन, दिनेश्वरीबाई युवराज गौतम सरपंच गोपाळटोली, ज्ञानेश्वरीबाई श्यामलाल पटले सरपंच मुरपार, प्रकाश राहांगडाले सरपंच मसवानी, देवलालजी कटरे आदी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रा. लीलेश्वर रहांगडाले, भाऊलाल चव्हाण, श्याम गौतम, मुन्नालाल चौधरी, डॉ. सोहन चौधरी, मुन्ना चौधरी, आदींनी केले आहे.