.# समस्यांवर आमदार यांनी घातली फुंकर.
# आवास योजनेच्या हप्त्यासाठी व शेतकऱ्यांना गोठ्यासाठी मोजावे लागतात रक्कम!नागरिकांची तक्रार.
# अनेक अधिकारी सभेतून पलायन
आमगाव :– आमदार संजय पुराम यांच्या मतदार संघातील आमगाव तालुक्यातील तहसील येथे आयोजित जनता दरबार सभेत नगर परिषद मधील समाविष्ट आठ गावातील नागरिकांनी समस्यांचे फलक झळकावून अनेक समस्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे अनपेक्षित नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जनता दरबारात एकच समस्यांचा धुव्वा उडाला.
आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी प्रशासनाच्या मार्फत जनता दरबार स्थानिक तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मात्र आमगाव नगर परिषद मधील समाविष्ट आठ गावातील नागरिकांनी जनता दरबारात समस्यांबद्दल फलक घेऊन आपली भूमिका मांडली. तर अनेक समस्यांबद्दल अधिकारी यांना धारेवर धरून तक्रार नोंद केली.यामुळे उपस्थित अनेक विभागातील अधिकारी यांची तारांबळ उडाली.
आयोजित जनता दरबार येथे यावेळी नायब तहसीलदार सतीश वेलादी, पोलीस निरीक्षक तिरुपती राने,पंचायत समिती सभापती योगिता पुंड, उपसभापती सुनंदा उके, जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढे, छबू ताई उके, एड. येशुलाल उपराडे, उमेश राहांडाले, राजू पटले, यशवंत मानकर, शिलाताई ब्राह्मणकर, विभागीय अभियंता अभिजित भांडारकर, जगदीश शर्मा, घनश्याम अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी नगर परिषद परिक्षेत्रातील नागरिक यांनी नगर परिषद येथील कर्मचारी नागरिकांकडून आवास योजनेतील निधी वळती करण्यासाठी मागणी केल्यावर संबधित कर्मचारी पहिला हप्ता देण्यासाठी पाच हजाराची लाच मागत असल्याची तक्रारी केल्या. यावर आमदार यांनी संबंधित कर्मचारी यांच्यावर कार्यवाही व गुन्हे नोंद करण्याची सूचना केली. तर पंचायत समिती येथे शेतकऱ्यांना लाभाचे गोठे करिता दोन हजाराचे लाच मागत असल्याची तक्रारी करण्यात आले यावेळी खंडविकास अधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना विद्युत पंप, तर वीज अविरत मिळावी यासाठी तात्काळ कार्यवाही निर्देश देण्यात आले. पीएम किसान लाभापासून मागील तीन वर्षांपासून वंचित शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कामचुकार करणाऱ्या अधिकारी यांना यावेळी आमदार पुराम यांनी चांगलेच धारेवर धरले तर शेतकऱ्याला लाभ देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे सूचना करण्यात आले. नगर परिषद परिक्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्यांवर उपस्थित कर्मचारी यांना योग्य कानउघाडणी करण्यात आले.
आयोजित जनता दरबारात तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. या निवेदनावर आमदार संजय पुराम यांनी स्वतः पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
# निहित रहांगडाले यांच्यावर कार्यवाहीची मागणी :– नगर परिषद मधील कंत्राटी कर्मचारी निहित रहांगडाले यांच्याकडे पीएम आवास योजनेचे बांधकाम कार्यासन देण्यात आले आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आवास योजनेतील लाभार्थीं यांच्या कडून बांधकाम हप्ता खात्यात वळविण्यासाठी खुल्या स्वरूपात लाच मागणी करीत असल्याची तक्रारी नागरिकांनी केली. यावेळी या कर्मचाऱ्यावर विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले.तर योजनेत पूर्वीच ज्या लाभार्त्यांनी घरकुल चे लाभ घेतले व बांधकाम केले अश्या लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मोठी रक्कम घेऊन लाभ दिल्याचे उघड तक्रार करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिल्याने अधिकारी यांचे चांगलेच घाम गळल्याचे दिसून आले.
# नगर परिषद स्थापनेच्या प्रलंबित प्रश्नावर नागरिकांनी झळकावले फलक : आयोजित जनता दरबार मध्ये नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक झळकावून आपली समस्यां पुढे ठेवली. या फलकातून वन पट्टे, घरकुल, पाणी, स्वक्षता, नाल्या, विद्युतच्या समस्यां समोर केली. व न्यायालयाच्या निर्णय प्रमाणे शासनाने निर्णय घेऊन तात्काळ अधिसूचना निर्गमित करण्याची मागणी केली. यावर आमदार संजय पुराम यांनी सदर विषय हा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या पुढे करून मागणीला पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.