आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाने नागरिकांना दिला सुरक्षिततेचा मंत्र 

0
22
वाशिम,दि.५ मार्च : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम आणि तहसील कार्यालय, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात पूर, वीज, आग, भूकंप, रस्ते अपघात आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाचा शुभारंभ तहसीलदार कुणाल झालटे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाचे विषय आणि मार्गदर्शन:या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी खालील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.
 पूर व्यवस्थापन: सुरक्षित स्थलांतर, बचावकार्य, पूर काळात घ्यावयाची काळजी.
वीज अपघात टाळण्यासाठी उपाय: सुरक्षित वीज वापर, वीज पडल्यास घ्यायची काळजी.
अग्निशमन व्यवस्थापन: आगीपासून बचाव, अग्निशमन यंत्रांचा योग्य वापर.
 भूकंप संरक्षण: भूकंपाच्या वेळी आणि नंतर घ्यावयाची काळजी.
रस्ते अपघात व्यवस्थापन: अपघात झाल्यास प्राथमिक उपचार, मदतकार्य.
 उष्णतेच्या लाटा: उष्माघातापासून बचावाचे उपाय.
या प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना आपत्ती काळात स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवावा, तसेच प्रशासनाला मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कशी भूमिका बजवावी, याची माहिती मिळाली. आपत्तीच्या वेळी सजगता आणि तत्परता राखून सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.