शेतकरी, महिला, वृद्ध, तरुण, प्रत्येक समाज, राज्यातील प्रत्येक भागाला न्याय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. व्यवसायपूरक वातावरण निर्माण करून उद्योगांना चालना देणे आणि रोजगार निर्मिती करणे, सोबतच एक जिल्हा एक उद्योग संकल्पनांवर काम करण्यासाठी १० हजार महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अर्थसंकल्पातून कटिबद्ध दिसली. सोबतच आवास योजनेसाठी ५० हजार रुपये अतिरिक्त राज्य सरकार देणार आहे. यामुळे महाराष्ट्राला संतुलित करणारा हा अर्थसंकल्प आहे.
– पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया