खामगाव तालुक्यात दोन गटात जातीय संघर्ष

0
30

बुलढाणा -जिल्ह्यात होळीचा उत्सव जल्लोषत साजरा करण्यात आला. होलिका दहन शांततेत पार पडले. मात्र रंगपंचमीचा दिवशी घडलेल्या दोन घटनानी या उत्सवाला गालबोट लागले. खामगाव तालुक्यातील आवार येथे दोन गटात रंग पंचमीच्या दिवशी संध्याकाळी दोन गटात जातीय संघर्ष उडाला. होळी निमित्त गावातील एका गटाच्या युवकांनी मिरवणूक काढली. यावेळी डीजे वर वाजविण्यात येणाऱ्या एका विशिष्ट गाण्यामुळे दुसरा गट दुखावला गेला.

यामुळे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. यामुळे दोन्ही गटातील सात ते आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच खामगावं ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वरिष्ठ अधिकारी आवार मध्ये दाखल झाले. जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान आज शनिवारी, १५ मार्चला देखील गावात तणाव पूर्ण शान्तता आहे. गावातील कडक पोलीस बंदोबस्त अजूनही कायम आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रोनिक लोढा याच्यासाह दोन उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी ‘कॉम्बिग’ सुरु केले असून धरपकडं करण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाच्या ३६ इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.