ग्रामस्वच्छता अभियानात देवलगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

0
100

अर्जुनी-मोर. -अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत देवलगावला सन 2023 – 24 चा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्यांमधून प्रथम पुरस्कार नवेगावबांध येथे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्यात प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार हा पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, घर गाव परिसर व स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोक सहभाग, आणि वैयक्तिक आणि सामूहिक पुढाकारातून राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबतीत उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानाथम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत ) वासनिक, आदर्श ग्राम पातोडाचे सरपंच भास्कर पेरे पाटील, तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार सरपंच सौ. दिपालीताई कापगते ,उपसरपंच तामदेव पाटील कापगते, माजी पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोळे, पंचायत समितीच्या सभापती आम्रपालीताई डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, अर्जुनी मोर.च्या गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी राणे, विस्तार अधिकारी शहारे, विस्तार अधिकारी आरोग्य पोगडे, विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी कु. एस. बी. राऊत, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी धर्मराज लंजे, कालिदास पुस्तोळे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच शारदाताई नाकाडे यांनी स्वीकारला. सदर गावाची विभागीय तपासणी होणार असून गाव तपासणीला सज्ज झालेला आहे. या गावच्या सरपंच दिपालीताई कापगते यांनी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोळे, जिल्हा समन्वय भाग्यश्वरजी रहांगडाले सर्व अधिकारी पदाधिकारी तथा गावकरी यांचे मनापासून आभार मानले.