सामाजिक वनिकरण तथा वनविभाग भंडारा (प्रादेशिक) च्या वतीने वनदिवस उत्साहात

0
29

२६ मार्चला  उत्पादक शेतकरी; व्यापारी उद्योजक मेळाव्याचे आयोजन….
भंडारा : जागतिक वनदिनानिमित्त सामाजिक वनिकरण विभाग भंडारा तथा वनविभाग भंडारा (प्रादेशिक) यांच्या वतीने शुक्रवार दि.२१ मार्च २०२५ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करुन जागतिक वनदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात सायकल व मोटारसायकल रॅली,मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर तसेच लघू बालचित्र (शॉटफिल्म)  स्पर्धेचा समावेश होता. तर  दि.२६ मार्च २०२५ ला भंडारा शहरातील जलाराम  मंगल कार्यालय येथे   उत्पादक शेतकरी, व्यापारी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित लघू बालचित्र (शॉटफिल्म) स्पर्धेत सहभागी निवड झालेल्या स्पर्धेकांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक वितरीत करण्यात आले.
दि.२१ मार्च २०२५ हा दिवस जागतिक वनदिवस असल्याने सामाजिक वनिकरण विभाग भंडारा (महाराष्ट्र वनविभाग) यांचे वतीने दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमातून जागतिक वनदिवस  भंडारा येथे उत्साहात साजरा  करण्यात आला. शुक्रवारला   भंडारा उपवनसंरक्षक कार्यालय  परिसर येथून सकाळी ७.३० वाजता सायकल  व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अधिकार्‍यांनी हिरवी झेंडी दाखवून  रॅलीचा शुभारंभ केला. दरम्यान  ‘झाडे लावा झाडे जगवा : निसर्ग वाचवा तसेच वनांचे रक्षण करा अशी जनजागृती केली. ही रॅली कॅम्पमधून निघून भंडारा  शहरातील मुख्य चौक मार्गाने जावून भ्रमंती  करून परत  कॅम्प परिसरात येवून रॅलीचा समारोप झाला. सदर रॅलीत सामाजिक वनिकरण विभाग व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निसर्ग प्रेमी, नागरिक  सहभागी झाले हाते.
रॅलीच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सा.व.वि.चे विभागीय वनअधिकारी, एल.ए.आवारे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ.यशवंत लांजेवार,वनपक्षेत्रधिकारी तथा सहा.वनसंरक्षक पी.एन.नाईक, सहा. वनसंरक्षक रितेश भोंगाडे, वनपाल  आर.टी.मेश्राम, पत्रकार राजु आगलावे, सेवानिवृत्त वनसंघटनेचे पदाधिकारी विजय  मेहर तसेच  सामाजकि वनीकरण  व  वन विभागाचे वनअधीकारीr, कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी  जागतिक दिनाचे महत्व काय आहे. व  आजच्या होणार्‍या ग्लोबल वार्निग व झाडे लावा व झाडांचे संवर्धन तसेच वनांचे संरक्षण यावर प्रकाश टाकून मार्मिक उदाहरण देवून मार्गदर्शन केले. त्यानंतर दिनाचे औचित्याने उपस्थित मान्यंवरांचे समोर युवक बिरादरीचे कलावंतांनी पथनाट्यातून वनरंक्षण, संवर्धन यासह नागरिकांनी वनांप्रती आपली निष्ठा आणि कर्तव्य याबबत वाहन जनजागृती रथ यावरील ध्वनीवदारे व कला सादर करून त्याचे महत्व पटवून दिले. त्यानंतर सदर जनजागृतीरथ कॅम्पमधून रवाना हावून भंडारा जिल्हयाच्या तालुक्यास्थळी पोहचून महत्वाच्या चौक स्थळी पथनाटयातून त्यांनी जनजागृती केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनपरिक्षेत्रधिकारी पी.एन. नाईक यांनी केले तर उपस्थितांचे आभार वनरक्षक कुरेशी  वंजारी यांनी मानले.त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर पार पडले.सदर शिबिराचे उद्घाटन वनविभाग भंडाराचे  उपवनसंरक्षक राहूल गवई व  वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक)  बेलखोडे यांचे हस्ते पार पडले.
या  आरोग्य शिबिरात अनेकांनी  आपली आरोग्य तपासणी करून घेतली  व यावेळी २२ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान करून आपले राष्टीय कर्तव्य पार पाडले.  तसेच लघू बालचित्र (शॉटफिल्म) स्पर्धा पडल्यात. स्पर्धेत -विषय (जल-जंगल-जमिन), सारस संवर्धन, वन्यजीव व अधिवास, आपला निसर्ग आदी विषय होते. या स्पर्धेत विभागाकडून प्रथम व द्वितीय तसेच तृतीय  सहभागी निवड झालेल्या स्पर्धकास- प्रथम पुरस्कार १० हजार, द्वितीय, ५ हजार, तृतीय ३ हजार रूपये पुरस्कार यांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह विभागाकडून मान्यवरांच्या हस्ते  पारितोषक वितरण कार्यक्रमातून देण्यात आलीत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वनपरिक्षेत्रअधिकारी तुमसरचे धनविजय, मोहाडीचे   गेडाम,बि.बी.मारबते,एस.पी.आखरे,पी.सी.पवार,आर.के.शिेंदे,डि.डब्ल्यूसुखदेवे,एम.एस.ङ्खवकर,ए.पी. जिरोपूरे,पि.पी.पवार, एस.एस. क्षिरसागर, आर.एम.टिचकुले, मिना पटले, अनिकेत तिरपुडे, वनपाल वासनिक यांचेसह वनकर्मचार्‍यांनी  परिश्रम घेतले.