गोंदिया,दि.२३ः-नवेगाव बांध येथील सरपंच मेळाव्यात सलग पाच वेळा हिरवे कार्ड मिळविणार्या ग्रामपंचायतींना ‘चंदेरी कार्ड’ प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित आले.यामध्ये ग्रामपंचायत देवलगाव,निमगाव व नानव्हा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवणार्या ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र देऊन गौरव देण्यात येत असून वर्ष 2023-24 साठीचा जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींनी चंदेरी कार्डचे निकष पूर्ण केले आहे.त्यात मोरगाव अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत देवलगाव व निमगाव तसेच सालेकसा तालुक्यातील ग्राम पंचायत नानव्हा यांचा समावेश आहे. दि.18 मार्च रोजी नवेगाव बांध येथील सरपंच मेळाव्यात तीनही ग्रामपंचायतीना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम , उपाध्यक्ष सुर्रेश हर्षे,जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चंदेरी कार्डचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दोन वेळा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. या स्वच्छता सर्वेक्षणातील निकषानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे, लाल कार्डाचे वितरण करण्यात येते.
आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे वर्षातून दोनदा स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये पाण्याच्या स्रोतांचे व व्यवस्थापनातील काही दोष आढळून येतात त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीस प्रतिबंध करता येतो. या सर्वेक्षणाद्वारे आढळून येणा-या निकषानुसार ग्रामपंचायतींना हिरवे ,पिवळे, लाल कार्ड व चंदेरी कार्ड वितरित करण्यात येते.चंदेरी कार्ड प्राप्त पात्र ग्रामपंचायतींपैकी 03 ग्रामपंचायतींना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी ग्रामपंचायत मध्ये सलग पाच वर्षे कोणत्याही प्रकारच्या जनजन्य साथीचा उद्रेक होऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी व ग्रामपंचायत मधील सर्व स्त्रोतांना सलग पाच वर्षे हिरवे काळ मिळवून देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक, आरोग्य सेवक,जलसुरक्षक यांचे अभिंदंन करुन ईतर ग्रामपंचायतीसाठी हे आदर्श ठरणार असल्याचे मनोगत व्यक्त यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे, समाज कल्याण समिती सभापती रजनीताई कुंभरे,अर्थ व बांधकाम समिती सभापती डॉ.लक्ष्मण भगत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती दीपा चंद्रिकापुरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, ग्रामीण प्रकल्प विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सामान्य प्रशास्न विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फनेंद्र कुतिरकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे आनंदराव पिंगळे यांचे सह जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी यांचे सह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व आदी उपस्थित होते.