विज ग्राहकांच्या जागृतीसाठी महावितरणची “रन फॉर सेफ्टी”मॅरैथॉन

0
40

200  हुन अधिक कर्मचा-यांनी नोंदवला सहभाग

गोंदिया -विज  ग्राहकांमध्ये विज अपघाताबाबत जागरुकता निर्माण व्हावी , व विज अपघाताचे प्रमाण कमी होऊन शुन्यावर यावे म्हणुन महावितरणने वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन -‘रन फॉर सेफ्टी’ आयेाजन केले आहे.  त्या अनुषंगाने गोंदिया परिमंडळ महावितरण चे मुख्य अभियंता सुहास रंगारी, यांचे हस्ते   मॅरेथॉन -‘रन फॉर सेफ्टी’* झेंडा दाखवुन  सुरुवात झाली.
या मॅरेथॉनला  आर. डी. राठोड, अधिक्षक अभियंता गोंदिया प्रविभाग,  आर. के.  गिरी,  अधिक्षक अभियंता, भंडारा प्रविभाग गोंदिया तसेच असित ढाकणेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) ,अनंत चवरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी,राजीव रामटेके, कार्यकारी अभियंता (प्रशासन) गोंदिया परिमंडळ, शैलेशकुमार कांबळे, कार्यकारी अभियंता(प्रशासन), संवसु प्रविभाग गोंदिया , आंनद जैन, कार्यकारी अभियंता, संवुस विभाग गोांदिया,गजानन जयस्वाल, कार्यकारी अभियंता, संवसु विभाग भंडारा,प्रशांत उईके, कार्यकारी अभियंता (प्रभारी) संवसु विभाग देवरी,अशोक ओझा, कार्यकारी अभियंता चाचणी विभाग भंडारा तसेच गोंदिया परिमंडळ अंतर्गत अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
“आम्ही सुरक्षचे शिल्पकार शुन्य अपघाताचे करु महावितरणचे ध्येय साकार “ हे ब्रिद वाक्य घेवुन महावितरणच्या सर्व क्षैत्रीय कार्यालीयात विद्युत सुरक्षा सप्ताह दरम्यान आज भाग म्हणुन गोंदिया परिमंडळ चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी  आज मॅरेथॉन मध्ये भाग घेवुन विज अपघात टाळण्याबाबत जनजागृती  करीता सहभाग नोंदविला.
यावेळी  अधिकारी/कर्मचारी यांनी  विज सुरक्षेबाबत संदेश देणारे फलक  हाती घेवुन विज सुरक्षेबाबत घोघणा देण्यांत आल्या. तसेव विज अपघात बाबत ग्राहंकाना दैनदिन जीवनात होणा-या अपघातातबाबत जनजागृती बाबत गोंदिया शहर उपविभाग मधील कर्मचा-यांनी पथनाटय सादर केले. कार्यक्रमाचे शेवटी सुहास रंगारी,   मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ  यांनी  उपस्थित कर्मचा-यांना विज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.