
गोरेगांव,दि.१५:-तालुक्यातील मुंडीपार येथील वार्ड क्रमांक.२ व ३ मधील नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाल्याने समस्या निवारणार्थ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत यांच्या पाठपुराव्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.गोंदिया अंतर्गत कृती आराखडयातुन हातपंपाचे खोदकाम करण्यात आले.सदर हातपंप सुरु झाल्याने येथील नागरिकांची पाण्याची समस्या दुर झाली असून नागरिकांनी अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत यांचे आभार मानले.