
तिरोडा : मागील काही वर्षांपासून महात्मा गांधी योजनेचा सर्व निधी थांबला होता; परंतु, काही दिवसांपूर्वी आपल्या जिल्ह्याला अपुरा निधी प्राप्त झाला. त्यामुळे काहींनी या घोळ करून निधी वळवून ऑर्डर करून घेतली. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत मांडवी व बेलाटीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगनाथन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
फंड ट्रान्सफर ऑर्डर एफटीओ फक्त विशिष्ट ७५ काढण्यात आले. याबाबत तिरोडा पंचायत समितीचे बीडीओ, सभापती यांना विचारणा केली असता आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही असे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जि.प. गोंदिया येथील एपीओ सुरेखा ब्राह्मणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली. शिष्टमंडळात बेलाटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोरेश्वर आगासे, मांडती ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र नागपुरे, कवलेवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच ओमप्रकाश भैरम, तिरोडा पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र चौधरी, जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, बालू बावनथडे यांचा समावेश होता.





