Home विदर्भ कुटुंबकल्याण आयुक्तांनी घेतला आरोग्याचा आढावा

कुटुंबकल्याण आयुक्तांनी घेतला आरोग्याचा आढावा

0

गोंदिया : जिल्ह्यातील आरोग्य विभागाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मंगळवारी (दि.२३) कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक मुंबई डॉ.आय.ए. कुंदन गोंदियात दाखल झाल्या. त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा दौरा करून पाहणी केली.

जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी चर्चा करून गोंदिया जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती जाणून घेतली. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील बाल व माता मृत्यू यावर भर देत हा आकडा शुन्यावर कसा येणार याच्या टिप्स दिल्या. गरोदर मातांची शंभरटक्के नोंदणी करून त्यांना नियमीत भेटी देऊन सर्व औषधीचा पुरवठा केला तर माता व बाल मृत्यूची प्रमाण कमी होईल असे सांगितले. या शिवाय गोंदिया जिल्ह्यात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाबाबत चर्चा केली. सिकलसेल, टेलीमेडीसीन बाबत माहिती घेतली. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डायलेसीस युनिटचीही पाहणी केली. धाबेपवनी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असल्याने ते काम पाहण्यासाठी त्या निघाल्या. या दौऱ्यात टेक्नीकल सहसंचालक डॉ. जोतकर, आर सी ब्युरोचे उपसंचालक डॉ. कोकणे होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर, गंगाबाईचे अधिक्षक डॉ.संजीव दोडके व कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे उपस्थित होते.

Exit mobile version