वर्धा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची कामे शिल्लक असल्याची बाब जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुढे आली आहे.
वर्धा तालुक्यात १५ हजार ९७८, सेलू ११ हजार ४८७, देवळी १२ हजार ७, आर्वी १२ हजार ३२७, आष्टी ७ हजार १०४, कारंजा ८ हजार ३६१, हिंगणघाट १३ हजार ८५७ आणि समुद्रपूर तालुक्यात १३ हजार ८७७ शौचालयाचे बांधकाम करावयाचे होते. मार्च २०१४ पर्यंत वर्धा १६२७, सेलू १६२६, देवळी १३०९, आर्वी १४६३, आष्टी ९१४, कारंजा ४७९१, हिंगणघाट १९६३ आणि समुद्रपूर तालुक्यात २०३० असे एकूण १५ हजार ७२२ शौचालयाचेच बांघकाम पूर्णत्वास झाले. यानंतर २०१४ अखेरची आकडेवाडी विचारात घेतली तर यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धेचा आकडा ४०४८ वर गेला. सेलू ३८००, देवळी ५३५२, आर्वी २६२१, आष्टी २३३४, कारंजा ५८८६, हिंगणघाट ४५९३ आणि समुद्रपूर तालुक्यातील शौचालये बांधकाम झाल्याचा आकडा ४२५१ झाला. वर्षाअखेरीस असे एकूण ३१ हजार ८५ शौचालयाचीच बांधकामे पूर्णत्वास जावू शकली.
यामध्ये केवळ ४ हजार ३५८ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धा ९६७, सेलू १४८, देवळी १२२, आर्वी ३६३, आष्टी ३६, कारंजा ८८२, हिंगणघाट १७२४ आणि समुद्रपूर तालुक्यात ११६ शौचालये बांधकामाचा समावेश आहे.
मात्र सर्व तालुक्यांचा विचार करता जिल्ह्यात ५९ हजार ५६५ शौचालयाचे बांधकाम अद्यापही शिल्लक असल्याची बाब बैठकीत पुढे आली. ही बांधकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे समजते. याबाबतचे निर्देशही सभाध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी संबधित यंत्रणेला दिले