Home विदर्भ गोंदियात बजरंग दलाने जाळले पोस्टर

गोंदियात बजरंग दलाने जाळले पोस्टर

0

गोंदिया-एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पीकेला बंदी घालण्यात कसलंही तथ्य नसल्याचं सांगितलं असतानाच दुसरीकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पीके चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि सिनेमागृहातील पोस्टरची आज जाळपोळ केली आहे.बजरंग दल शहर प्रमुख वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वात नारेबाजी करुन पोस्टर जाळण्यात आले.

पीके चित्रपट बंद करावा यासाठी बजरगं दल कार्यकर्त्यांनी नागपूरच्या प्रभात संगम चित्रपटगृहात प्रवेश करुन शो बंद पाडण्यास बाध्य केले.तसेच नारेबाजी केल्याने चित्रपटगृहाच्या परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आमीर खानच्या पीके चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असली तरी, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ही बंदी फेटाळून लावली आहे. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या पीके चित्रपटावर बंदी घालण्यात कोणताही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

पीके चित्रपटाला याआधीच सेन्सॉर बोर्डानं परवानगी दिली आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘पीके’च्या वादावर पडदा टाकला होता.

मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी पीके चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे राज्यात असलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडून या वादाला पूर्ण देण्याचा प्रयत्न केला होता.

Exit mobile version