Home विदर्भ तलाठय़ांना कालबध्द पदोन्नती द्या

तलाठय़ांना कालबध्द पदोन्नती द्या

0

गोंदिया : तलाठय़ांच्या विविध मागण्यांना घेऊन विदर्भ पटवारी संघाने गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन सादर केले. त्यात १२ वर्ष व २४ वर्ष सेवा केलेल्या तलाठय़ांना कालबध्द पदोन्नती देण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला.निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात अध्यक्ष एम.यू. राजुरकर, सरचिटणीस संजय अनव्हाणे, आर.पी. वैद्य, एन.एस. लिल्हारे, बी.डी. भेंडारकर, राजेश बोडखे, बी.एस. ठाकरे, एम.आर. पांडे, डी.एम.मेश्राम, सतिश पारधी, ए.पी. निखारे, डी.टी. हत्तीमारे, एस.टी. अंबादे व डी.एस. मडावी यांचा समावेश होता.
विदर्भ पटवारी संघाने शनिवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तलाठय़ांची सेवा पुस्तीका अद्यावत करा, जून २0१३ पासून मुख्यालय भाडे एक हजार रूपये त्वरीत देण्यात यावे, १ सप्टेंबर २0१२ पासून कटंगीकला सा.क्र.४१ व नंगपूरा र्मुी सा.क्र.४२ ह्या नविन साझ्याची निर्मीती झालेली आहे. परंतु मुख्यालय भाडा मिळालेला नाही. काटी येथील तलाठी डी.एस. मडावी यांच्या ग्रेड पे च्या दुरूस्तीत तफावत करावी, ए.पी.निखारे व पी.बी.निमजे यांचे निलंबनकाळ हा कर्तव्यकाळ म्हणून नियमीत करण्यात यावे, तसेच निलंबन कालावधीतील वेतन व भत्ते न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काढावे, बी.एस. ठाकरे व एस.आर. राठोड यांचे प्रलंबित वैद्यकीय बील काढण्यात यावे, सेवानवृत्त मंडळ अधिकारी पी.डी.दमाहे यांचा महागाई व प्रवास भत्ता काढण्यात यावा, गोंदिया तहसील कार्यालयातील आस्थापना लिपिकाला बदलवून दुसरा लिपीक द्यावा, सेवानवृत्त तलाठी ए.जी. धमगाये यांचे सेवानवृत्ती बिल अजूनपर्यंत मिळाले नाही. गुदमा सा.क्र.३४ ला लोखंडी आलमारी पुरविण्यात यावी, १ वर्षावरील निलंबित असलेल्या तलाठय़ांचे प्रस्ताव आयुक्तांना सादर करून त्यांना त्वरीत कामावर घेण्यात यावे, सेवानवृत्त तलाठी सतीश पारधी यांचे अपील प्रकरण मंजूर करून त्यांची थकबाकी देण्यात यावी, अतवृष्टीची नुकसान यादी तयार करणार्‍या तलाठय़ांना ५ टक्के मोबदला देण्यात यावा, सन २0१४ मध्ये तलाठय़ांना स्थानांतर विनंती अर्ज दिले होते त्यात कारवाई झाली नाही. एकोडीचे तलाठी एस.आर. राठोड यांचे मे २0१४ चे वेतन अद्याप मिळाले नाही ते देण्यात यावे व गर्राचे तलाठी एम.के.मेश्राम यांचे अपील प्रकरण निकाली काढण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.

Exit mobile version