Home विदर्भ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजासाठी काम करा

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजासाठी काम करा

0

साखरीटोला : विद्यार्थ्यांनो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले करा. आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा. कमीत कमी बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळा व सदैव सतर्क राहा, असे आवाहन करीत आ. संजय पुराम यांनी शाळेच्या आवारभिंतीसाठी तीन लाख रूपये देण्याची घोषणा केली.
स्थानिक बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयात आ.संजय पुराम व त्यांच्या पत्नी सविता पुराम यांचा कॉलेजच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे उद््घाटन आ. पुराम यांच्या हस्ते जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम, प्राचार्य सागर काटेखाये, तंमुसचे माजी अध्यक्ष प्रकाश दोनोडे, प्रा. व्ही.एस. दखने, प्रा. एम.आय. बडगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात देवी सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पणाने झाली.संचालन सुनील वाघमारे यांनी तर आभार प्रा. गणेश भदाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. मधूकर केंद्रे, भास्कर, कुंभलवार यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!
Exit mobile version