Home विदर्भ मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी क्रुड ऑईल रिफाईनरीचा प्रकल्प आणणार-खा.पटोले

मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी क्रुड ऑईल रिफाईनरीचा प्रकल्प आणणार-खा.पटोले

0

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हाच आपला प्रमुख उद्देश आहे.या क्षेत्रात औद्योगिक विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरिता केंद्रसरकारकडे क्रुड ऑईल रिफाईनरीचा पेट्रोकेमिकल प्रकल्प मध्यभारतातील गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.ते गोंदिया येथील विश्रामगृहात पत्रकारपरिषदेत बोलत होते.खासदार पटोले म्हणाले की,भविष्यातील सर्वंच गोष्टींचा विचार करीत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्यभारत हे अत्यंत सुरक्षित आहे.देशातल्या ज्या काही क्रुड ऑईलच्या रिफाईनरी आहेत,त्यापैकी मध्यप्रदेशातील बिना येथील वगळता सर्वच समुद्रकिनाèयावर आहेत.त्याठिकाणाहून होणारी वाहतुकीचा खर्चाचा भार सर्वसामान्यांवर पडतो.तेच प्रकल्प मध्यभारतातील गोंदिया भंडारा जिल्ह्यात उभारला गेल्यास येथून लगतच्या मध्यप्रदेश,छत्तीसगड,आंध्रप्रदेश,तेलंगणा या चार राज्यासह विदर्भाला सुध्दा होईल.या ऑईल रिफाईनरीपासून १४ प्रकारचे प्रोडक्ट तयार होत असून त्यावर आधारीत विविध औद्योगिक कंपन्या याठिकाणी तयार होऊ शकतील.आणि एक औद्योगिक हब या भागात तयार होऊ शकतो.त्यामुळेच आपण यासाठी आग्रही भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याशी भेट घेऊन प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी सांगितले.या क्रुड रिफाईनरीपासून पांढèया रंगाच्या केरोसीन ते विमानात वापरल्या जाणाèया इंधनासह पेट्रोलही तयार केला जातो.या सर्व गोष्टी आपल्याच भागात तयार होऊ लागल्या तर ३ ते ४ रुपयाची बचत होईल सोबतच औद्योगिकरणामूळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
मतदारसंघातील सर्व नगरपरिषद क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाच्या विविध योजना असूून या योजनेतून शहराचे सौंदर्यीकरण,रस्ते आदी प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गोंदियाच्या रेल्वेतलावाचे सौदर्यींकरण करण्याचे नियोजन असून गोंदिया हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक भविष्यात होणार असल्याने काही रेल्वेगाड्या येथून सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात मागणी करणार असल्याचे सांगितले.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी केंद्रीय वैद्यकीय चमू येऊन गेली.त्यांनी काही त्रुट्या काढल्यामुळे प्रश्न सध्या गंभीर झाला असून तो प्रश्न सोडवून कुठल्याही परिस्थितीत पुढच्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालय सुरू कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री,वित्तमंत्री यांच्याशी भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर भेलच्या सदंर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी
साकोली जवळील भेल प्रकल्पासंदर्भात आपण जेव्हा केंद्रीय अ‹वजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना भेटलो तेव्हा त्यांनी हा प्रकल्प होणे शक्य नाही असे सांगत,निवडणुकीच्या आधी संबधित मंत्री असेच प्रकल्पाचे भूमिपूजन करून सुरक्षा qभत तयार करतात.नंतर मात्र काहीच होत नसल्याचे सांगत देशात असे ७ प्रकल्प भेलचे असल्याचे सांगितले.त्यावर आपण माजी मंत्री व राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना भेटून केंद्रीय अवजड उद्योगमंत्र्यांनी अशी माहिती दिल्याचे सांगितले.तेव्हा आपण त्यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या कामासाठी मदत करा असे त्यांना म्हटले पंरतु त्यामुद्यावर केंद्रीय अ‹वजड उद्योगमंत्र्याकडे भेटीला प्रफुलभाई आलेच नाही असे सांगत आपण मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची मदत अवश्य घेऊ असे सांगितले.प्रफुलभाईंचा अनुभव दांडगा आहे,ते मंत्री राहिले आहेत,आम्ही फक्त सदस्य आहोत.सदस्यांच्या मर्यादा असतात परंतु मंत्र्याकडे विस्तारीत क्षेत्र असते त्यामुळे त्यांच्या लाभ मतदारसंघासाठी नक्कीच घेतला जाईल असेही पटोेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी जिल्हा बँकेचे सचांलक रेखलाल टेंभरे,माजी जि.प.सदस्य खुमेंद्र मेढे,उपसभापती दामोदर नेवारे,गुड्डू कारडा,रेखाबाई लिल्हारे,राम पुरोहित आदी उपस्थित होते.

Exit mobile version