Home विदर्भ मनरेगातून शौचालय बांधकामावर भर-जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा

मनरेगातून शौचालय बांधकामावर भर-जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा

0

नागपूर: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून नागपूर जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून त्यापैकी तीन हजार रुपये लाभार्थ्यांना तातडीने दिले जातील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव गोंधळे यांनी सांगितले.
मनरेगा योजनांची माहिती प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) सुजाता गंधे उपस्थित होत्या. मनरेगाच्या विविध योजना आणि त्या राबविण्याची कार्यपद्धती याबाबत कार्यशाळेत विस्तृत माहिती देण्यात आली. शिवाजीराव जोंधळे म्हणाले की ,या योजनेतून १६ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देय आहे. त्यातील तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून दिली जाईल व त्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल. या कामासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना परवानगी दिली जाईल.
सुजाता गंधे यांनी या योजनेत ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे महत्त्व विशद केले. जिल्हा कृषी अधिकारी (मनरेगा) पल्लवी तलमले यांनी योजनेच्या अटी व शतीर्ंची माहिती दिली. लेखाधिकारी आर.पी. पागोटे यांनी वित्तीय तरतुदीं सांगितल्या तर जिल्हा समन्वयक रवींद्र भुते यांनी संकेतस्थळाबाबत माहिती दिली. कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी संचालन व आभार मानले.(प्रतिनिधी)

Exit mobile version