Home विदर्भ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार-पालकमंत्री

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार-पालकमंत्री

0

मुंडीकोटा : समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवार्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र मागील १५ वर्षात या योजनेचा पाहिजे तसा लाभ समाजाला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी काळात मागास समाजाच्या प्रगतीकरीता मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थाना बळकटी देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
मुंडीकोटा येथील समता मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फायनन्स कार्पोरेशन लि. मुंबईचे संचालक मुकुंदराव पन्नासे, धनंजय मोहोकर, गोपीकिशन मुंदडा, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, माजी आ. हरीश मोरे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, जि.प. सदस्य तेजेश्‍वरी भोंगाडे, पं.स. सदस्य संध्या भरणे, गटविकास अधिकारी जमईवार, संतोष चव्हाण, सरपंच निर्मला भांडारकर, उपसरपंच देवेंद्र मंडपे, संस्थेचे अध्यक्ष बुलंद गजभिये, सचिव देवीदास भुतांगे, भाऊराव उके, प्रदिपसिंग ठाकूर, जगदिश अग्रवाल, नंदकुमार बिसेन, मिनू बडगुजर, सविता इसरका, किशोर हालानी, चतूभरूज बिसेन, मनोज शिंदे, वसंत भेंडारकर, दिनेश मिश्रा, त्रब्यंक खरबीकर, ईश्‍वरदयाल पटले, सिध्दार्थ गजभिये, महेंद्र डोंगरे, प्रकाश शेडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धनंजय मोहोकर यांनी, ना.बडोले हे राज्यातील असे पहिले सामाजिक न्यायमंत्री आहेत ज्यांनी मागासवर्गीयांच्या गृहनिर्माण सहकारी संस्थाना प्रत्यक्ष भेट देवून समस्या जाणून घेतल्या.त्यामुळे प्रगतीचे दरवाजे उघडले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच ईश्‍वरदयाल पटले यांनी केले.यावेळी ना.बडोले यांचा संस्था व हाऊसिंग कॉ.-ऑपरेटीव्हतर्फे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. राजेंद्र पटले यांनी केले तर आभार राजा बंसोड यांनी मानले. दरम्यान ना.बडोले यांनी वसाहतीची पाहणी करून लाभार्थ्यांशी चर्चा केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Exit mobile version