Home विदर्भ केंद्रीय आरोग्य पथकाची सामान्य रुग्णालयाला भेट

केंद्रीय आरोग्य पथकाची सामान्य रुग्णालयाला भेट

0

गोंदिया, दि. २1 : जिल्हयातील आरोग्य सेवेचे संनियत्रण, मुल्यमापन, सबलीकरण व श्रेणीवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य पथक दिल्ली यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालय व अधिनस्त रुग्णालयाला भेट दिली. यावेळी नागरिकांना उच्चप्रतीच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. जी.एल.दूधे उपस्थित होते.
गोंदिया हा जिल्हा आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असून जिल्हयातील विकासात्मक बाबींचा विचार करता येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यात यावे.अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी केली. ज्यामध्ये कॅथलॅब, अँजीओप्लास्टी, अँजीओग्राफी, किडनीप्रत्यारोपन सारख्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात याव्या असेही त्यांनी सुचविले. यावेळी रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा जिल्हयात उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती पथक प्रमुखानी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली.
केंद्रीय पथकाच्या भेटीदरम्यान नेत्र शल्यचिकित्सक डॉ. राज वाघमारे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव दोडके, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्रीमती वानखेडे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. स्नेहा वंजारी, डॉ. घरडे, शुक्ला, डॉ. सुवर्णा उपाध्याय, सांख्यिकी सहायक निशांत बन्सोड, अनिरुध्द शर्मा, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक अजित सिंग, शैलेश टेंभरे, जितंद्र पारधी, सचिन लोखंडे व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version