Home विदर्भ टोलविरोधात मुख्यमंत्र्यांच्या काकू रस्त्यावर

टोलविरोधात मुख्यमंत्र्यांच्या काकू रस्त्यावर

0

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या माजी आमदार शोभा फडणवीस टोल वसुलीविरोधात आज (बुधवारी) रस्त्यावर उतरल्या. शोभा फडणवीस यांच्यासह अनेक भाजप कार्यकत्यांनी आज सकाळी आठ वाजता मनसर आणि बोरखेडीच्या टोलनाक्यावर आंदोलन केले. नाके बंद करण्‍याची त्यांनी मागणी केली. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आता मुख्यमंत्री फडणवीस या आंदोलनावर काय भूमिका घेतात याकडे, सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसर आणि बोरखेडीचे टोलनाके बंद करण्याची मागणी यापूर्वीही शोभाताईंनी केली होती. होती: मात्र, राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे राज्यात भाजपचे सरकार आहे. मनसर आणि बोरखेडी प्रकल्पासाठी खर्च झालेल्या रुपयांसह व्याजही ऑपरेटर कपंनीने वसूल केले आहे. तरी देखील टोलवसुली सुरुच आहे.

दरम्यान, राज्यातून टोल हद्दपार केला जाईल, अशी घोषणा भाजपने सत्तेत येण्यापूर्वी केली होती. मात्र, राज्यात सत्ता स्थापन करणार्‍या भाजपने सरकारने हा शब्द फिरवला आहे. राज्यात सर्वत्र टोलनाके सुरु असून वाहन चालकांकडून वसुली केली जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या माजी आमदार शोभा फडणवीस टोलवसुली विरोधात सरसावल्या आहेत.

बोरखेडी व मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शोभाताई फडणवीस यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. दोन्ही टोलनाक्यांवर अवैधरीत्या वसुली सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

या मार्गावर 95 किलोमीटर रस्त्याचे काम पीपीपी तत्त्वार दिले आहे. मात्र, या रस्त्याचे आतापर्यंत केवळ 58 किलोमीटर काम झाले आहे. पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या कोणत्याही प्रकल्पाचे काम 75 टक्के पूर्ण झाल्यानंतरच त्याची वसुली करता येते. मात्र 60 टक्के काम झाले नसतानाही संबंधित कंपनीने टोल वसुली सुरु केली आहे. या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट पुढील 22 वर्षे म्हणजे 2037 पर्यंत दिले गेले आहे. तसेच 45 किलोमीटर अंतरादरम्यान केवळ 2 टोलनाके बसविण्याची गरज असताना प्रत्यक्षात 4 टोलनाके बसवून बेकायदा लूट केली जात आहे.

Exit mobile version