Home विदर्भ गोंदिया जिल्हा दारुबंदी करा

गोंदिया जिल्हा दारुबंदी करा

0

गोंदिया : वर्धा, गडचिरोली नंतर चंद्रपूर जिल्हा दारु जिल्हा दारूमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. याच बरोबर गोंदिया जिल्हा दारु मुक्त करावा, अशी मागणी धनंजय वैद्य यांनी केली आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली प्रमाणे गोंदिया जिल्हा राज्याच्या सीमेला लागून आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड मधून अवैध दारु गोंदिया जिल्ह्यात येते. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आहे तसेच दारुमुळे बर्‍याच कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होत आहे. आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे दारुमुक्त करावी अशी मागणी महिला मंडळे करीत आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २0१५ पासून दारु मुक्त करावे यासासाठी आंदोलनाची तयारी होत आहे. ग्राम पंचायतने दारुबंदीचा ठराव जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आहे.

Exit mobile version