गोंदिया येथे 7 ऑगस्टला रानभाजी महोत्सव

0
714

गोंदिया, दि.4 :मानवी जीवनामध्ये सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. सकस आहारामध्ये विविध भाज्यांचा/फळांचा समावेश आहे. सद्याच्या परिस्थितीमध्ये रानातील भाजी तसेच शेत शिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे उत्पादीत रानभाज्या/फळे यांचे शहरातील नागरिकांना विक्री होण्याच्या दृष्टीने त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल या दृष्टीकोनातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त वतीने 7 ऑगस्ट 2020 रोजी नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी यांनी या महोत्सवाला आवर्जुन भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.