39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज 59 रुग्णांना डिस्चार्ज 110 पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात आज 59 रुग्णांना डिस्चार्ज 110 पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 2216 बरे झालेले रुग्ण 1075 क्रियाशील रुग्ण 1104 आज 00 मृत्यू एकूण मृत्यू 37

0
177

blank

भंडारा दि. 08 (जिमाका) जिल्ह्यात आज 59 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 110 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1075 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2216 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 69, साकोली 04, लाखांदूर 01, तुमसर 10, मोहाडी 10, पवनी 05 व लाखनी तालुक्यातील 12 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 1075 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 2216 झाली असून 1104 क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 37 झाली आहे.
आज 08 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 161 व्यक्ती भरती असून 1453 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14844 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 1564 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 13280 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

blank