Home गुन्हेवार्ता गुरनोली फाट्यावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

गुरनोली फाट्यावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

0

कुरखेडा,दि.२४: कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गुरनोली फाट्याजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.साधारणत: ५० वर्षे वय असलेला हा इसम शर्ट व हाफपँट घातलेला आहे. दाढी व डोक्याचे केस वाढलेले असून, तो हडकुळा आहे. विमनस्क अवस्थेत तो बरेचदा गेवर्धा व कुरखेळा भागात फिरत होता. कुणी काही पदार्थ खायला दिलेच तर तो स्वीकारत होता. आज अचानक त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप उलगडलेले नाही.

Exit mobile version