Home गुन्हेवार्ता जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणत्र कोर्टात नेले, पोलिसांच्या जाळ्यात सापडले

जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणत्र कोर्टात नेले, पोलिसांच्या जाळ्यात सापडले

0

गोंदिया:कोर्टानं ठोठावलेला आर्थिक दंड वाचवण्यासाठी जिवंत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र नेणाऱ्यांचा पोलिसांनी मोठ्या हुशारीनं पर्दाफाश केला. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रकार गोंदियामध्ये घडलाय. या प्रकरणात कोर्टानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलंय. त्यांना 5 वर्ष कैद आईणि 1000 रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या वतीनं ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस कर्मचारी मेथीलाल ब्रिजलाल भंडारी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत कोर्टानं श्रीकांत भैयालाल मोटघरे आणि प्रवीण गभणे यांना 10 हजारांचा आर्थिक दंड ठोठावला होता. या निर्णायाच्या विरोधात प्रवीण गभणेनं अपील केलं होतं. या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान प्रवीण गभणेचा मेहुणा श्रीकांत मोटघरे गैरहजर होता. त्यावर प्रवीणने श्रीकांत मोरघरे याचे मृत्यू प्रमाणपत्र कोर्टात सादर केले.प्रवीणनं मृत्यू प्रमाणपत्र सादर करताच गोंदिया पोलीस कामाला लागले. त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून श्रीकांतला पकडलं आणि कोर्टात सादर केलं. मृत्यू प्रमाणपत्र सादर केलेल्या व्यक्तीलाच कोर्टात सादर केल्यानं संपूर्ण बनाव उघड झाला. या प्रकरणात गोमदिया न्यायालयानं दोन्ही आरोपींना सबळ पुराव्याच्या आधारे दोषी ठरवलं आहे. दोन्ही आरोपींना कलम 555/17 कलम 420, 468 अन्ववये दोषी ठरवत 5 वर्षांची कैद आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयानं दिली आहे.

Exit mobile version