Home गुन्हेवार्ता सावली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार ; तिघांना अटक

सावली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार ; तिघांना अटक

0

सावली,दि.15ः- येथील वनपरिक्षेत्रातील मरेगाव येथील शिकारी वडील आणि मुलाला वन्यप्राणी मित्र आणि वन अधिकार्‍यांनी धाड टाकून चितळ मास आणि शिकारीला लागणारे हत्यारासह अटक केली आहे. या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सोमवार १४ मे रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे भारतीय वनजीव संरक्षण संस्थेचे मुल येथील सदस्य उमेशसिंह झिरे यांनी मरेगाव हे वनपरिक्षेत्र सावली यांच्या हद्दीत येत असल्याने क्षेत्र सहाय्यक सावली विनोद धुर्वे यांना माहिती दिली. त्यानंतर दादाजी भोयर याचे घरी धाड टाकली असता चितळ या वन्यप्राण्याचे शिजलेले मास मिळाले घरच्या लोकांना विचारपुस केली असता, दादाजी हा चिमढा या गांवी मांस विक्री करीता गेला आहे, तर दादाजीचा मुलगा गंगाधर भोयर हा मुल येथे मांस विक्रीकरीता गेला आहे. वनप्राणी मित्र मनिष रक्षमवार आणि तन्मयसिंह झिरे यांनी सापळा रचून मुल येथील ढिवर मोहल्ला या क्षेत्रात गंगाधरला मास विक्री करण्याकरीता ग्राहक पाहत असताना रंगेहात पकडले आहे. त्याचे जवळ पॉलिथीनमध्ये चिताळाच्या शरिराचे ९ हिस्से सापडले. गंगाधरला घेऊन त्याच्या घरी गेल्यानंतर अधिक चौकशी केली असता, शिकारीला लागणारे हत्यारेही मिळाले आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९, २७, ३१, ३९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गंगाधर दादाजी भोयर,दादाजी वैतागु भोयर, देवराव बापूजी मांदाडे या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या पूर्वी ही शिकार केली काय? या दिशेने ही वनविभाग पुढिल तपास वन परिक्षेत्र सावली येथील क्षेत्र सहाय्यक विनोद धुर्वे हे करीत आहे.
यावेळी चंद्रपूर अधिकारी श्रीनिवास लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी जी. व्ही. धाडे, सर्पमित्र उमेश झाडे,आर. एन. नाखरे, एस. एम. ननावरे, व्ही. जी. चौधरी, एम. जी. घोडमरे, निलेश निरंजने उपस्थित होते.

Exit mobile version