Home Featured News ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर

ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर

0

चंद्रपूर,दि.04ःः – येथील प्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये आज रविवारी(दि.4) पर्यटकांना एक सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाला. जंगल सफारीच्यावेळी वाघाच्या या जंगलात एक दुर्मीळ असा ब्लॅक पॅंथर पर्यटकांना पाहायला मिळाला. पर्यटकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.याआधी मे 2018 मध्ये बेल्जियमवरून आलेल्या पर्यटकांना ताडोबा येथील कोळसा वनपरिक्षेत्रात शिवनझरी येथील पाण्याच्या टाकीवर काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. या जोडप्याने ताडोबात दुर्मीळ असा ब्लॅक पॅंथर दिसल्याची माहिती दिली होती. ताडोबातील या ब्लॅक पँथरच्या दर्शनाने पर्यटकांना पर्यटनाची नवी पर्वणी मिळणार आहे.

Exit mobile version