Home मराठवाडा जिल्हा परिषदेच्या कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने भागवत देवसरकर सन्मानित

जिल्हा परिषदेच्या कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने भागवत देवसरकर सन्मानित

0

नांदेड दि. 17 -नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा कृषीनिष्ठ पुरस्कार माळेगाव यात्रेमधील कार्यक्रमामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी भागवत देवसरकर यांना सपत्निक प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, विभागिय कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे, मुळे साहेब, जिल्हा परिषद कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, समाजकल्याण सभापती शीलाताई निखाते, माजी सभापती प्रकाशराव देशमुख, संजय बेळगे, प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या पूनमताई पवार, प्रणितीताई देवरे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रावणगावकर, मधुकर सरोदे, चंद्रसेन पाटील, भीमराव पाटील कल्याणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पंडितराव मोरे, मोहीम अधिकारी विनायक संरदेशपाडे, अनिल शिरफुले, कृषी अधिकारी लोहा विश्वभंर मंगनाळे, विश्वास अर्धापुरे, पंचायत समिती कृषि अधिकारी डी.एल. जाधव हदगाव, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे महानगराध्यक्ष परमेश्वर काळे, प्रसिद्धीप्रमुख दीपक पवार, सुनील ताकतोडे, भगवान पा.बहिरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

Exit mobile version