Home गुन्हेवार्ता महाराष्ट्रात आणखी एका बँकेत घोटाळा, जैस्वाल बंंधूना अटक झाल्याने खळबळ

महाराष्ट्रात आणखी एका बँकेत घोटाळा, जैस्वाल बंंधूना अटक झाल्याने खळबळ

0

छत्रपती संभाजीनगर– सध्या RBI ऍक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करीत 9 कोटींचे कर्ज उचलल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी गुन्हे शाखेने तत्काळ दोन आरोपींना अटक देखील केली आहे. अभिषेक जगदीश जैस्वाल आणि अमरिश जगदीश जैस्वाल अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी अभिषेक जैस्वाल हे भाजप पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींनी कर्ज काढल्यावर कोणालाही खबर लागू दिली नाही, मात्र ज्यावेळी कर्जाचा भरणा झाला नाही, त्यावेळी बँकेने जप्तीची नोटीस काढल्यावर बँकेने कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली असता हा घोटाळा असल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान, या घोटाळ्यामुळे निर्बंध घालण्यात आल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार पैसा अडकल्याने टेन्शनमध्ये आले आहेत. तसेच या बँकेतील खातेदारांचे शेकडो कोटी बँकेमध्ये अडकल्याने खातेदारांना नेमकं काय करायच आहे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित पडला आहे.

या बँकेतून जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करत 9 कोटींचं कर्ज घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी अभिषेक जयस्वाल आणि अमरीश जयस्वाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक जयस्वाल हा भाजपचा पदाधिकारी असून जिल्हा बँकेचे संचालक देखील आहेत. त्यामुळे या घोटाळ्या प्रकरणात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक आणि इतरांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version