Home Top News मुलचेरा तालुक्यात नक्सलवादयानी जाळले दोन ट्रक

मुलचेरा तालुक्यात नक्सलवादयानी जाळले दोन ट्रक

0

गडचिरोली,दि.7 :- मुलचेरा तालुक्यातुन हाकेच्या अंतरावर असलेल्या गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळुन ड्रायव्हर ला मारहान केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.मुलचेरा पोलीस स्टेशन अंतर्गत एटापल्ली रस्त्यावरील गट्टा या गावातिल जंगलात एफ डी सी एम चे काम सुरु आहे दिवसभर काम झाल्यावर रात्री चारचाकी वाहन गट्टा गावात ठेवली जाते याच वाहनांना काल रात्री नक्षलवाद्यांनी टार्गेट केले असून मध्यरात्री सुमारे 12 च्या दरम्यान मोठ्या संख्येने शस्त्रदारी नक्षलवादी गावाजवळ आले आणि तीन ते चार नक्षलवादी गावात झोपून असलेल्या वाहन चालकांना उठवून मारहाण करत चारचाकी वाहन गावाबाहेर लावायला सांगितली आणि ती वाहन जाळुन टाकली.
गट्टा रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावून कसनासुर बोरिया घटनेचा निषेध करत 10 में रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले. गावातील लोकं आणि वाहन चालक मुलचेरा पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती देण्यासाठी पोहोचले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक पुढील तपास करीत आहे.

Exit mobile version