Home विदर्भ जिल्ह्यातील 39 आरोग्य संस्थांना कायाकल्प योजनेतंर्गत 14 लाख 85 हजार रुपयांचे पुरस्कार

जिल्ह्यातील 39 आरोग्य संस्थांना कायाकल्प योजनेतंर्गत 14 लाख 85 हजार रुपयांचे पुरस्कार

0

कायाकल्प” द्वारे होत आहे आरोग्य संस्थांचा कायापालाट-एम. मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी 

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरासाठीचा प्रथम मानांकन पुरस्कार गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुरला – रु दोन लाख जाहीर.

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरासाठी गोंदिया तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोरणीला – रु.एक लाखासाठीचा प्रथम पुरस्कार

गोंदिया- आरोग्य संस्थामधील सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 39 आरोग्य संस्थांना 2022-23 वर्षातील कामगिरी केल्याबद्दल 14 लाख 85 हजार रुपयांचे कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिली आहे..आरोग्य संस्थानी आपल्यात बदल करुन आपला कायापालट केल्याबद्दल एम.मुरुगानंथम यांनी आनंद व्यक्त करुन सर्व पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.इतरही आरोग्य संस्थेने स्पर्धेत उतरुन गुणवत्ता वाढवुन उत्तम आरोग्य सेवा लोकांना देण्याचे आवाहन त्यांनी ह्याप्रसंगी केले आहे.
रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी 2015 वर्षापासुन कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली असून या पुरस्काराकरिता रुग्णालयांची आतील व बाह्य परिसर स्वच्छता, निर्जंतुकीकरण,बेड स्वच्छता,उपलब्ध साधनांचा वापर,योग्य आय.ई.सी लावणे, प्रसूतीगृहाचा वापर व स्वच्छता, प्रयोगशाळा बळकटीकरण व स्वच्छता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा,लोकसहभागातुन कार्यक्रम राबविणे,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर,जैविक घनकचऱ्याचे व्यवस्थापन व त्यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणी बचत व सांडपाण्याचा निचरा, कर्मचाऱ्यांचे रुग्णासोबत वर्तणुक, रुग्णांचे मनोगत आदि प्रत्येक बाबीसाठी गुण असून या निकषांवर पुरस्कार जाहीर केले जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या वेळी दिली. .
आय.एस.ओ. मानांकनाच्या धर्तीवरील या पुरस्कारासाठी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सुविधा उपलब्ध करून स्वतः तपासणी करून प्रस्ताव सादर करतात त्यानुसार जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी केली जाते तसेच जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असल्याची माहीती जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ.पंकज पटले यांनी यावेळी दिली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यां विविध स्तरातुन मानांकन देवुन पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित वाघमारे यांनी या वेळी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरासाठीचा प्रथम मानांकन पुरस्कार गोंदिया तालुक्यातील भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला रु दोन लाख तर प्रोत्साहनपर खालील 9 प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रत्येकी रु.50 ह्जार पुरस्कार करिता निवड झाली आहे.त्यात गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी व कोरंभीटोला, सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा, गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी, देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी व मुल्ला,सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध व दरेकसा ई.चा समावेश आहे.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरासाठी गोंदिया तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोरणीला रु.एक लाखासाठीचा प्रथम पुरस्कार तर आमगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बनगावला रु.50 हजार साठीचा उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार  व तिरोडा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वडेगाव ला रु.35 ह्जाराचे उत्तेजनार्थ द्वितीय पुरस्कार साठी निवड झाली असुन खालील 26 उपकेंद्राना प्रोत्साहनपर रु.25 ह्जार पुरस्कार करिता निवड झाली आहे.पुढिलप्रमाणे तालुकानिहाय उपकेंद्र
सडक अर्जुनी तालुक्यातील 1 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र घटेगाव.
सालेकसा तालुक्यातील 3 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तिरखेडी, सोनपुरी व खोलगड.
तिरोडा तालुक्यातील 4 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात उपकेंद्र पांजरा, काचेवानी, गंगाझरी व उपकेंद्र मंगेझरी चा समावेश आहे.
गोरेगाव तालुक्यातील 2 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात उपकेंद्र कटंगी व उपकेंद्र कालीमाटी चोपा.
देवरी तालुक्यातील 2 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात उपकेंद्र डवकी व उपकेंद्र पुराडा.
गोंदिया तालुक्यातील 12 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात उपकेंद्र पांढराबोडी ,उपकेंद्र नवरगावकला, उपकेंद्र बनाथर, उपकेंद्र कंटगीकला ,उपकेंद्र खमारी ,उपकेंद्र बटाणा ,उपकेंद्र नागरा, उपकेंद्र बिरसोला, उपकेंद्र तेढवा, उपकेन्द्र कटंगी, उपकेन्द्र छिपीया व उपकेंद्र दांडेगाव चा समावेश आहे.
आमगाव तालुक्यातील 1 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र दहेगाव ठाणा.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 1 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खोली.
पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सर्व वैद्यकिय अधिकारी , सामुदायिक आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका ,आरोग्य सेवक , आरोग्य सेविका, आशा सेविका, परिचर , स्वछक यांनी आपल्या आरोग्य संस्थेला जास्त गुण मिळणे व ऊत्तम आरोग्य सुविधा लोकांना मिळण्यासाठी कडी मेहनत घेतली त्यासर्वांचे काम अभिनंदनास पात्र असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version