Home विदर्भ लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार – केंद्रीयमंत्री उमा भारती

लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार – केंद्रीयमंत्री उमा भारती

0

गोंदिया – केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती या रायपूर येथून qछदवाडा येथे जात असतांना आज ५ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर आल्या होत्या. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भेरसिंगभाऊ नागपुरे,  विनोद अग्रवाल, जि. प. सभापती छायाताई दसरे दिनेश दादरीवाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, दीपक कदम, जि. प. सदस्य कमलेश्वरी लिल्हारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, त्यांना भाजपातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
निवेदनात प्रामुख्याने, महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्यात यावे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोधी समाजातील सुशिक्षित तरूणांना याचा केंद्रीय नोकरभरतीत आरक्षणाचा लाभ होईल. लोधी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला असल्याने महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये या समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ठ केले आहे. राज्यात ज्याप्रमाणे या आरक्षणाच्या सुविधा प्राप्त आहेत, तशा केंद्रातील यादीत लोधी समाजाचे नाव नसल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्यात यावे.
दरम्यान, सुश्री उमा भारती यांनी, लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाघ नदीवरील प्रकल्पाकरिता दिल्ली येथील अधिकाèयांना या प्रकल्पाबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून प्रकल्पाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री qसचन योजनेकरिता २० हजार कोटीचे बजेट असून यामाध्यमातून राज्य सरकारला निधी दिला जाणार आहे. प्रकल्पाचे बळकटीकरण व पाण्याच्या लहान स्त्रोतांचा विकासाकरिता सरकार कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री qसचन योजनेतंर्गत आपल्या क्षेत्रात भरीव कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित जलसंधारणाचे अधिकारी नरेंद्र ढोरे, निखारे, अग्रवाल यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाची माहिती घेवून त्यांना उपाययोजनाबाबत निर्देश दिले.
यावेळी प्रामुख्याने, जयंत शुक्ला,  लक्ष्मण चुटे, राजीव ठकरेले, संजय मुरकुटे, अमित झा, सुनिल केलनका, पंकज सोनवाने, कुशल अग्रवाल, आत्माराम दसरे, रोहीत दादरीवाल, अजित मेश्राम, रामु लिल्हारे, संजय नागपुरे, उमेश बंबारे, कमलकिशोर लिल्हारे, सुरेश लिल्हारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version