Home विदर्भ नवरात्र उत्सवात पाकिस्तानी फुग्यांची विक्री

नवरात्र उत्सवात पाकिस्तानी फुग्यांची विक्री

0

गोंदिया,दि.27 – सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून गोंदिया शहर या उत्सवासाठी नेहमीच ओळखले जाते.या उत्सवाच्या दरम्यान विविध दुकानेही सजलेली असतात.त्यातच काही समाजकंटकांनी नवरात्रोत्सवाला गालबोट लावून शहरात जातीय मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान आय लव्ह यु, पाकिस्तान जिंदाबादचे फुगे विक्री करण्याकरीता दुर्गामंडळ व रासगरबाच्या ठिकाण निवडल्याचे आढळन आल्याने शिवसेनेच्या युवा सेनेने ते  फुगे घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.यात युवा सेना कार्यकर्ता हर्षल पवार व त्यांच्या चमूने पुढाकार घेतला. लहान मुलांच्या हातातील फुगे बघितल्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना शंका आली असता त्यांनी ते फुगे जवळून बघितल्यावर पाकिस्तान जिंदाबाद असा उल्लेख आढळून आला.त्यानंतर काही लहान मुले पाकिस्तान लिहिलेले फुगे विकताना आढळून आले. त्यांच्या जवळील संपूर्ण फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत घेत गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलांची यासंदर्भात विचारपूस करून सोडण्यात आले. शहरात कुठलेही चिमुकले किंवा व्यापारी अश्या पद्धतीचे फुगे विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्या जवळील संपूर्ण फुगे विकत घेत याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी आणि युवा सेनेनी नागरिकांना केले आहे. गोंदियाच्या बाजारात हि फुगे आली कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version