
गोंदिया,दि.०४- जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, अधिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल कितपत माहिती आहे,हे जाणून घेण्याकरीता निवडणुकीच्या काळात कर्मचारी यांना काम नसल्याचे गृहीत धरुन मोबाईलवर आॅनलाईन बैठका आयोजित करुन मार्गदर्शन आढावा घेण्याचे काम गेले महिनाभर चालले.त्या महिनाभर चाललेल्या प्रत्यक्ष व मोबाईलवरील बैठकीनंतर येथील एका सभागृहात परीक्षा घेण्यात आली.एवढंं करुनही ५० गुणाच्या परीक्षेत अंदाजे ४० कर्मचार्यांना ३५ गुणही मिळविता आले नाही.यावरुन ते कर्मचारी मुकाअ यांच्या परीक्षेत नापास झाले हे स्पष्ट झाले आहे.परंतु महिनाभर मोबाईलवर कार्यालयीन कामकाजाच्या वेेळेत चाललेल्या त्या आॅनलाईन बैठकांकडेही लक्ष नव्हते हे सुध्दा स्पष्ट झाले आहे.