Home विदर्भ तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुक प्रक्रिया उत्साहात

तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुक प्रक्रिया उत्साहात

0
तिरोडा,दि.04: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संघटनात्मक निवडणुकांची प्रर्किया सुरु करण्यात आली असून तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुक प्रर्किया माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारे लाॅन येथे आयोजित पक्षाच्या बैठकित पार पडली.यावेळी तिरोडा तालुका व शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष पदाकरिता झालेल्या प्रर्कियेत निवड करण्याचे अधिकार खासदार प्रफुल पटेल यांना देण्याचे बैठकित सर्वानुमते ठरविण्यात आले.माजी आमदार दिलीप बंसोड यांनी प्रस्ताव सादर करताच बैठकीत उपस्थित सर्वांनी त्यास अनुमोदन केले. बैठकीला निवडणुक अधिकारी म्हणून अर्बन बैंक संचालक गोपीचंद थावानी उपस्थित  होते.तिरोडा तालुका अध्यक्षाच्या निवडीचे अधिकार खासदार प्रफुल पटेल यांना देण्याचा प्रस्ताव पंचम बिसेन यांनी ठेवला.त्यास  वाय.टी.कटरे,राजलक्ष्मी तुरकर,थानसिंग हरिनखेडे,राध्येशाम नागपुरे,प्रभु पटले, पप्पू सैयद,रोशन बडगे,उषा किंदरले यांनी अनुमोदन केले.त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष निवडीचे अधिकार देण्याचा प्रस्ताव अजय गौर यांनी ठेवला.त्यास अविनाश जायसवाल, राजु केसरवानी,नरेश कुंभारे,श्यामराव भोंडेकर, जगदीश कटरे यांनी अनुमोदन केले.
बैठकीला प्रेम रहांगडाले, जिब्राईल पठान, कैलाश पटले, प्रिती रामटेके, रामकुमार असाटी, मनोज डोंगरे, नीता रहांगडाले, किशोर पारधी, सुनिता मडावी, डाॅ. सुशिल रहांगडाले, विणा बिसेन, राजेश तुरकर, हेमंत हट्टेवार, आशिष चैधरी, माया शरणागत, अनिल पारधी, जगदीश कटरे, देवेंद्र चौधरी, बाळु भगत, गजानन बारापात्रे, नरेश असाटी, छाया भगत, सोनु पारधी, मुन्ना उपवंळशी,राजेश पेशने, विनोद सोनवाने, संजय पटले,शंकर बिंझाडे, जागेश्वर निमजे, देवेंद्र मंडपे, मनिराम हिंगे, नरेश जुनेवार, बबन कुकडे, मिताराम मेश्राम, चुन्नीलाल रहांगडाले, अनिल भगत, विजय कटरेसह मोठ्या संख्येतकार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version