वाशिम(Washim): शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते सिव्हील लाईन (Civil Line) परिसरात जाणाऱ्या मार्गावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेली दुचाकी MH 37 X 9060 या क्रमांकाची असून आगीत ती पूर्णतः जळून खाक(burn up) झाली आहे. घटना स्थळाजवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस महादेव वानखेडे यांनी अग्निशमन दलाला(fire brigade) संपर्क साधून घटनेची माहिती दिली.