Home विदर्भ नगरसेवक मेश्राम व तिवारींचे नगरपरिषद सीईओ व अध्यक्षांच्या कक्षासमोर आंदोलन

नगरसेवक मेश्राम व तिवारींचे नगरपरिषद सीईओ व अध्यक्षांच्या कक्षासमोर आंदोलन

0

गोंदिया,दि.१०-गोंदिया नगरपरिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक भागतव मेश्राम,सुनिल तिवारी व देवा रुसे यांनी आज मंगळवारला आपल्या प्रभागातील पाणीटंचाईच्या समस्येला घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरवात केल्याने नप प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.प्रभाग क्रमांक २० च्या या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाणीसमस्या दुर करण्यासाठी तसेच नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यासाठी लेखी पत्र देण्यात आले होते.त्यानुसार सीईओ चंदन पाटील व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यावतीने १५ फेबुवारी २०१८ रोजी लेखी पत्र देत आठ दिवसाच्या आत प्रभागातील समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले गेले होते.परंतु महिना लोटूनही समस्या सोडविण्यात न आल्याने १० एप्रिलरोजी सकाळीच नगरसेवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कार्यालयासमोर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलनाला सुरवात केल्याने नगरपरिषदे पाणीप्रश्नी किती गंभीर आहे हे दिसून आले.या नगरसेवकांच्या आंदोलनाला नगरपरिषदेच बांधकाम सभापती शकील मंसुरी यांनीही पाqठबा देत हजेरी लावली.सोबतच मोंटु पुरोहित,आलोक मोहंती यांच्या काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी हजेरी लावली आहे.

Exit mobile version