Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

0

गोंदिया,दि.21ः- जिल्ह्यात आठवभरापासून दमदार पाऊस येत असून पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले व धरण पाणीसाठा मुबलक प्रमाणात वाढला असून सरासरी ८५ टक्के पाऊस पडला आहे.रात्रीलाही रतनारा,तिरोडा,वडेगाव,महागाव,अर्जुनी मोरगाव,मुंडिकोटा,केशोरी,डव्वा,सडक अर्जुनी व सौंदड या महसुल मंडळाच्या ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असून सकाळपासून जिल्ह्यातही रिमझिम पाऊस सुरु झाले आहे.

तालुका निहाय स्थिती बघता जिल्ह्यात १ जून ते २0 ऑगस्टपयर्ंत गोंदिया तालुक्यात 868.98 मिमी. तर गोरेगाव तालुक्यात 919.49 मिमी., तिरोडा734.38 मिमी., अर्जुनी-मोर 894.29 मिमी., देवरी 791.35 मिमी., आमगाव  940.82 मिमी., सालेकसा 775.35 मिमी., सडक अर्जुनी 993.63 मिमी. असा जिल्ह्यात 856.03 मिमी सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून ज्याची टक्केवारी ८५ टक्के आहे. समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात  (दि.२0) दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाने सुरूवात केली. यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महागाव, सिरोली, निलज, इटखेडा यांचा अर्जुनी मोरगाव तालुकास्थळाची संपर्क तुटला होता. पुरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाला असून खबरदारी म्हणून उपाययोजना केली जात आहे.

Exit mobile version