गडचिरोली दि.02: : नागपूर मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या कैद्यांच्या ० ते १८ वर्षे वयोगटातील २० पाल्यांना शिक्षणासाठी दरमहा आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पाच्या पुढाकारातून त्या लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.